लोहारा/प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण  दिनानिमित्त लोहारा तहसील कार्यालयात तहसीलदार विजय अवधाने  व भुकंप पुनर्वसन विभागाचे लिपिक तथा महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत भागवत गायकवाड यांच्या पुढाकाराने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन तहसीलदार विजय अवधाने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद रक्तपेढीने रक्ताचे संकलन केले. या शिबिरात शहरासह ग्रामीण भागातील 31 नागरीकांनी  रक्तदान केले. यावेळी प्रमुख म्हणून ग्रामीण रुग्णालय अधिक्षक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी,  स्पर्श व्यवस्थापक डॉ. रमाकांत जोशी, अशोक कटारे, डॉ  यादनीक रणखांब, जगदिश कुलकर्णी,आझम शेख,प्रविण कांबळे, संभाजी रणखांब, गणेश साळुंकेसाळुंके, महसुलचे बालाजी चामे, उतम मोदीराज, वजीर मनियार, संतोष गवळी, अशोक क्षिरसागर, महादेव जाधव, शंभुराजे पाचाळ, ब्रम्हानंद मठपती, प्रकाश वडणे, प्रविण माटे, दगडु चव्हाण, राजु स्वामी, दता बोराडे आदी उपस्थित होते.
 
Top