परंडा / प्रतिनिधी -
बीएससी पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करून मंजूरी आदेश निर्गमित करावेत याबाबत शिक्षणाधिकारी(प्रा.)रोहिणी कुंभार मॅडम यांना प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा करून प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
शालेय शिक्षण व क्रिडा विभाग,महाराष्ट्र शासन यांचे शासन परिपत्रक क्रक्र.वेतन 1216/प्र.क्रक्र.-123/16/टीएनटी-3 दि.13 ऑक्टो.016 च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत इ.6वी ते 8वी या वर्गांना शिकवणा-या शिक्षकांपैकी 1/3 शिक्षकांना सेवाज्येष्ठते प्रमाणे पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करणे बाबत शासन निर्देश आहेत.त्यानुसार कार्यरत प्राथमिक पात्र पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेणी मंजूर करून न्याय द्यावा.
परिभाषित अंशदायी  निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा दुसरा हप्ता 1 जूलै 2020 रोजी संबंधित शिक्षकांना नियमित वेतना सोबत रोखीने अदाई करण्यात यावा. सीएमपी वेतन प्रणाली कार्यान्वित करून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे वेतन थेट कॅफो टू शिक्षकांचे खातेवर जमा करून पगाराला दरमहा होणारा विलंब टाळून दरमहा 1 तारखेला वेतन अदाई करावी.चटोपाध्याय वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी अपात्र ठरलेल्या 76 शिक्षकांची त्रुटींची पुर्तता केल्याने तात्काळ मंजूरी आदेश निर्गमित करावेत. 30 जून 2020 पर्यंत 12 वर्षे अखंडित सेवा पूर्ण झालेल्या पात्र शिक्षकांचे प्रस्ताव मागणी आदेश काढून सर्व गटशिक्षणाधिकारी यांना कळवावे. या शिक्षकांचे जिव्हाळयाच्या प्रश्नां संबधी ठोस पावले उचलत तातडीने कार्यवाही करत सर्व प्रस्ताव निकाली काढण्या संदर्भात शिक्षणाधिकारी यांनी आश्वासित करून शब्द दिला.
यावेळी प्रहार शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष वैजिनाथ सावंत,दत्तात्रय पुरी,विशाल अंधारे,शहाजी झगडे,मोहन वाघमोडे,संतुक कडमपल्ले,  बाळासाहेब घेवारे,अमिन मुलाणी,सुषमा सांगळे-वनवे,भास्कर कांबळे,गणेश गोरे,साहेब पवार,फिरोज शेख, अरिफ शेख,दत्तात्रय राठोड, रघुनाथ दैन,धनंजय आंधळे,हनुमंत माने,योगेश चाळक,धम्मदिप सवाई आदि.पदाधिकारी यांचे वतीने निवेदन देण्यात आले.
 
Top