तेर/प्रतिनिधी -
तेर येथे अण्णाभाऊ साठे नगर मध्ये  लहुजी शक्ती सेनेच्या वतीने  आशा स्वयंसेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याबाबत, सविस्तर माहिती अशी की, येथे तेर येथे 26 मे रोजी अण्णाभाऊ साठे नगर मध्ये पुणे येथून आलेल्या या व्यक्तीचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झालेले असतानाच आरोग्य कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका यांच्या वतीने दररोज बाधित क्षेत्रात येऊन प्रत्येक कुटुंबाची आरोग्यविषयक जाणीव, जागृतीसह सर्वच माहिती मिळवण्याचे काम केले.
या सर्व आशा स्वयंसेविका आणि आरोग्य कर्मचा-यांचा लहुजी शक्ती सेनेच्या उस्मानाबाद तालुका महीला आघाडीच्या अध्यक्षा  लतिका पेठे यांच्या वतीने व हस्ते तसेच जिल्हा उपाध्यक्ष संभाजी कांबळे यांच्या  हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अजय कांबळे , सोनल पेठे, दिपक डोलारे आदी उपस्थीत होते.

 
Top