उस्मानाबाद /प्रतिनिधी
हवामानावर आधारीत फळपिक विमा योजना पुढील तीन वर्षासाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.उस्मानाबाद जिल्ह्यासाठी मृग बहारात मोसंबी, चिकू, डाळींब व लिंबू या पिकांचा समावेश आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसूचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधित बँकेस विमा हप्ता कपात न करण्याचे घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होण्यासाठी घोषणापत्र  देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजने अंतर्गत पाऊस, पावसाचा खंड, सापेक्ष आर्द्रताया हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे.
 या योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करणे बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधार कार्ड, सातबारा उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांश सह फोटो व बँक पासबुकची प्रत इत्यादी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. खालीलप्रमाणे विमा हप्ता रक्कम भरुन पिक संरक्षित करणे आवश्यक आहे.मोसंबीया फळ पिकासाठी प्रतीहेक्टरी 80 हजार रुपये विमा संरक्षितरक्कम आहे. त्याचा विमा हप्ता (शेतकरीहिस्सा) 4 हजार रुपयेअसून त्याचा विमाहप्ता भरण्याचा अंतिम दिनांक 30 जून, 2020 आहे.
चिकूया फळ पिकासाठी प्रती हेक्टरी 60 हजार रुपये विमा संरक्षितरक्कम आहे. त्याचा विमा हप्ता (शेतकरीहिस्सा) 3   हजार रुपये असून त्याचा विमा हप्ता भरण्याचाअंतिम दिनांक 30 जून, 2020 आहे.डाळींब या फळपिकासाठी प्रती हेक्टरी एक लाख 30 हजार रुपये विमा संरक्षित रक्कमआहे. त्याचा विमा हप्ता (शेतकरीहिस्सा) 6 हजार 500रुपयेअसून त्याचा विमा हप्ता भरण्याचाअंतिम दिनांक 14जुलै, 2020 आहे.लिंबू या फळपिकासाठी प्रती हेक्टरी 70 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. त्याचा विमा हप्ता (शेतकरीहिस्सा) 3 हजार 500 रुपये असून त्याचा विमा हप्ता भरण्याचाअंतिम दिनांक20 जून, 2020 आहे.मोसंबी या फळपिकासाठी हवामानावर आधारित फळपीक विमायोजना मृगबहारासाठी उस्मानाबाद तालुक्यातीलउ स्मानानाबाद ग्रामीण, पाडोळी, तेर, ढोकी, जागजी आणि कळंब तालुक्यातील शिराढोण ही महसूलमंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.
 चिकू या फळपिकासाठी हवामानावर आधारित फळपीक विमायोजना मृग बहारासाठी परंडा तालुक्याती लपरंडा, आसू, आनाळा, सोनारी आणि भूम तालुक्यातील माणकेश्वर ही महसूलमंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.डाळींब या फळपिकासाठी हवामानावरआधारित फळपीक विमायोजना मृगबहारासाठी उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.लिंबू या फळपिकासाठी हवामानावर आधारित फळपीक विमायोजना मृगबहारासाठी तुळजापूर तालुक्यातील सावरगाव आणि परंडा तालुक्यातील परंडा, आसू, आनाळा, सोनारी ही महसूल मंडळे अधिसूचित करण्यात आली आहेत.वरील नमूद केलेल्या महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. संबंधित मंडळातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी बजरंग मंगरुळकर यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठीPMFBY.gov.inया संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषि कार्यालयाशी संपर्क साधावा 
 
Top