तुळजापूर/ प्रतिनीधी
तालुक्यातील अणदूर गावा जवळील महामार्गावर  ईनोव्हा गाडीतुन 97 किलो गांजा घेवुन जाताना उपविभागीयपोलीसअधिकारी डाँ दिलीप टिपरसे यांनी त्यांच्या सहकार्यान सह ताब्यात घेवुन एकुण 3469200 रुपयचा मुद्देमाल सह दोघा जणांना ताब्यात घेतले. ही कारवाई गुरुवार दि 18 रोजी करण्यात आली .
या बाबतीत अधिक माहीती अशीकी, पोलीस अधीक्षक राजतीलक रौशन,अपर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ दिलीप टिपरसे सोबत सपोनि राऊत,सपोनि शरदचंद्र रोडगे,नायब तहसीलदार भारती,सपोफौ सातपुते,पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस नाईक रवी राऊत, कोष्टी,सोनवणे,हजारे,पोलीस कॉन्स्टेबल माली व कोलारे यांनी अणदूर गावाजवळ सोलापूर जाणारे महामार्गावर वाहन क्रमांक MH 25 AL 9199 इनोव्हा गाडी पकडली यात  बाळासाहेब परबत रा तडवळे ता माढा .सोमनाथ कदम रा कदमवस्ती ता मोहोळ हे त्यांचे कब्जात बेकायदेशीररीत्या अमली पदार्थ गांजा 97 किलो कि.अं.19,59,200 रु चा वाहतूक करताना मिळून आले .त्यांचेकडे गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 34,69,200 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला.
पोलीस ठाणे नळदुर्ग येथे NDPS कायद्याअंतर्गत सपोनि राऊत यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून त्याचा तपस सपोनि चव्हाण हे करीत आहेत
 
Top