नळदुर्ग / प्रतिनीधी
 नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या मातोश्री यमुनाबाई (अम्मा) रंगराव अहंकारी यांचे वयाच्या ८० व्या वर्षी अल्पशा आजाराने दि.१८ जुन रोजी रात्री १.३० वा. दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने नळदुर्ग शहरांवर शोककळा पसरली होती. सकाळी १० वा. येथील अलियाबद स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी सर्वच क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते. नगरसेवक विनायक अहंकारी यांच्या मातोश्री यमुनाबाई रंगराव अहंकारी यांचे अल्पशा आजाराने उमरगा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना दि.१८ जुन रोजी रात्री १.३० वा. दुःखद निधन झाले. त्या अतीशय मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पाश्चात्य दोन मुले, विवाहीत मुली नातवंडे असा परीवार आहे. येथील अलियाबद स्मशानभुमीत सकाळी १० वा. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, व पत्रकारीता क्षेत्रांतील नागरीक उपस्थित होते.

 
Top