तुळजापूर / प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील शेतकरी कर्जपुरवठा पासुन वंचित राहणार नाही याची काळजी बँकांनी घ्यावी असे प्रतिपादन खा ओमराजे निंबाळकर यांनी पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील राष्ट्रीयीकृत बँकेची खरीप हंगाम पिक कर्ज संदर्भात खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली.यावेळी ते बोलत होते.
फैठकीस प्रामुख्याने जिल्हा अग्रणी बँकेचे विजयकर, सहाय्यक जिल्हा निबंधक श्री.कुलकर्णी, उपस्थितीत होते. यावेळी बोलताना खा निंबाळकर म्हणाले की, बँकांनी ऑनलाईन पद्धतीने स्टॅम्प पेपर शुल्क आकारणी करण्याचे बँकांना अधिकार दिलेले असल्याने कर्जासाठी स्टॅम्प पेपर साठी पायपीट करायला न लावता स्टॅम्प पेपरचे शुल्क ऑनलाईन पद्धतीने बँकेतच भरून घ्यावेत, आपल्या बँकेकडील पूर्वी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांन कडून फेरफार नक्कल घेऊ नय, सामाईक क्षेत्रासाठी सर्व खातेदारांचे खाते काढून सह कर्जदार म्हणून घेऊन कर्ज देण्यात यावे. वयस्कर कर्जदार च्या घरातील व्यक्तीला सह कर्जदार म्हणून घेऊन कर्ज देण्यात यावे. इतर बँकेचे बेबाकी प्रमाण घेण्या ऐवजी स्टॅम्प पेपरवरती हमी पत्र घेण्यात यावे. तसेच ऊस कारखाण्याचे हमी पत्र मागणी करू नये. त्याऐवजी ऊस लागण पत्र घ्यावे असे निर्देश खासदार दिले.
याबैठकी प्रसंगी शहरप्रमुख सुधीर कदम, उपतालुका प्रमुख सुनिल जाधव, ग्राहक संरक्षण तालुकाप्रमुख मेजर राजेंद जाधव, माजी युवासेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, सोशल मिडीया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, भारत पाटील, रोहित चव्हाण, शंकर गव्हाणे, सिद्राम कारभारी, बालाजी पाचाळ, स्वरूप कांबळे, तसेच सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांचे व्यवस्थापक, बँक प्रतिनिधी उपस्थित होते.