नळदुर्ग / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय अरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी दि. ११ जून पासून न्याय मागण्या करीता काम बंद आंदोलन सुरु केले आहे, यापूर्वी शासनाने या बाबत त्रिसदस्यीय समीती तयार केलेली होती, मात्र या समीतीने आध्याप पर्यंत कोणाताही निर्णय न घेतल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हे आंदोलनाचे पाउल उचचले आहे. गेली अकरा दिवस झाले हे आंदोलन चाल आहे पंरतु याकडे शासनाने आदयाप ही दुर्लक्ष केले आहे.
राष्ट्रीय अरोग्य अभियानामध्ये अधिकारी व कर्मचारी हे अरोग्य विभागातील अत्यंत महत्वाचे घटक असून महाराष्ट्र औषध निर्माण अधिकारी संघटना, महाराष्ट्र राज्य त्यांच्या आंदोलनास सशर्त पाठींबा देत आहे. दरम्यान महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय अरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे आज ही कंत्राटी बेसीक वर काम करीत आहेत, दरम्यान या सर्व कंत्राटी कर्मचारी व अधिकारी यांना शासनाच्या सेवे मध्ये घेवून त्यांचे समायोजन करावे व त्यांना पगार वाढ करण्यात यावी या मागणीसाठी तुळजापूर तालुक्यातील कंत्राटी अरोग्य कर्मचाऱ्यांचे तालुका अध्यक्ष विनोद मोरे व महीला तालुका अध्यक्षा सौ. सुमन फुले यांच्या नेतृत्वाखाली एकूण ३६ कर्मचाऱ्यांनी दि. ११ जून पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. यामध्ये कंत्राटी कोवीड योध्दयांना कायम करण्यात यावे, हे सर्व कर्मचारी सन २००५ पासून कंत्राटी सेवेत कामावर आहेत. दरम्यान त्यांच्याकडून शासनाच्या कायम कर्मचाऱ्याबरोबर काम करुन घेतले जात आहे. दरम्यान गेल्या पंधरा वर्षापासून हे कर्मचारी कामावर आहेत त्यामुळे शासनाकडून जे नवीन कर्मचारी भरती करण्यात येणार आहे, त्या पूर्वी पंधरा वर्षापूर्वी पासून कंत्राटी पध्दतीने तुटपूंज्या पगारावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आगोदर कायम करुन त्यांचे समायोजन करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांची आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तुळजापूर तालुक्यातील राष्ट्रीय अरोग्य अभियाना अंतर्गत कार्यरत असणारे कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दि. ११ जून पासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. सध्या हे आंदोलन अकरा दिवस संपूर्ण राज्यात सुरु आहे. दरम्यान या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून सध्याच्या कोरोना विषाणूच्या संसर्ग जन्य रोगामध्ये मोठया प्रमाणात त्यांचे कार्य कौतुकास्पद होत आहे. त्या मुळे या कंत्राटी कोवीड योध्दयांचा शासनाने तात्काळ विचार करुन त्यांना शासनाच्या कायमस्वरुपी सेवेत समायोजन करुन घ्यावे अशी मागणी होत आहे. त्या मागणीसाठी त्यांच्याकडून सध्या काम बंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
 
Top