तुळजापूर / प्रतिनिधी:
पेरलेले बियाणे न उगवल्या प्रकरणी  कंपनीवर कारवाई करुन शेतकऱ्यांना आठ दिवसात मदत मिळवून देवुन शेतकऱ्यांना न्याय देण्याच्या मागणी चे निवेदन स्वाभीमानी शेतकरी संघटनेने शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना देऊन केली .
स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, कोविड 19 काळात शेतकऱ्यांना फळबागेतुन अर्थिक उत्पन्न न मिळाल्याने त्यांना अर्थिक मदत द्यावी, कर्जमाफी प्रकरणी अनेक शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही तो मिळवून द्यावा अशा मागणी चे निवेदन स्वाभीमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे,  धनाजी पेंदे,  गुरु भोजणे, राजेंद्र हाके सह शेतकऱ्यांनी दिले आहे.

 
Top