उस्मानाबाद /प्रतिनिधी-
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत शासनाचा निधी अपहार झालेल्या रु. ९ कोटी ५१ लाख ७१ हजार १०० रकमेच्या कामांसंबंधी सर्व संबंधित अधिकारी  व कर्मचारी यांची कर्तव्यानुसार कार्यसूची (Job chart) मिळण्याची मागणी भाजपाचे प्रतोद तथा आमदार सुजतिसंह ठाकुर यांनी केली आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या निधी अपहार व गैरव्यवहाराची मी मा. विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे तक्रार करुन चौकशी समिती मार्फत चौकशीची मागणी केली होती. माझी तक्रार व मागणीवरुन विभागीय आयुक्तांनी ५ सदस्यीस चौकशी समिती गठीत केली होती. सदर चौकशी समितीच्या अहवालात शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्याने १२ मे २०२० रोजी आपणांस अहवालासह पत्र देऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर एकुण रु. ९,५१,७१,१००/- शासकीय निधीचा अपहार करुन शासनाची फसवणूक केल्याचे वेगवेगळे ४ गुन्हे २७ जून २०२० रोजी आनंदनगर पोलीस ठाणे, उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आले आहेत.
शासनाच्या अपहार झालेल्या रु. ९,५१,७१,१००/- रकमेच्या कामासंबंधी सदर प्रकरणाच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करणे, मंजूरी देणे, प्रशासकीय मान्यता देणे, कार्यारंभ आदेश देणे, गुणवत्ता तपासणी, वस्तू स्वीकारणे, निधी वितरण अशा सर्व शासनाच्या प्रचलित कार्यपध्दतीनुसार अनुसरावयाची कार्यपध्दतीसह सर्व संबंधित कर्मचारी व अधिकारी यांची कर्तव्यानुसार जबाबदारी काय होती ? याबाबतची कार्य सुची (Job Chart) या प्रकरणातील तक्रारकर्ता म्हणुन देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

 
Top