कळंब/प्रतिनिधी
कळंब तालुक्यातील अनेक नागरिक रेशनकार्ड धारक रेशनकार्ड आँनलाईन नसल्याने त्यांना रेशनचा माल मिळत नसल्याने त्यांची उपासमार होऊ लागली आहे,त्यामुळे सदरील रेशनकार्ड आँनलाईन करुन रेशनकार्ड धारकांची उपासमार थांबवण्याची मागणी मानवहित लोकशाही पक्षाच्या वतीने दि.२९जुन रोजी कळंब तहसिलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे की,कळंब तालुक्यातील आनेक गावामध्ये रेशनकार्ड धारक आँनलाईन पासुन वंचीत असल्याने त्यांचा मिळणारा हक्काचा रेशनचा माल त्यांना मिळत नसल्याने त्यांची गैरसोय व उपासमार होऊ लागली आहे.त्यामुळे आशा वंचीत लाभधारकांची शोध मोहिम राबवून त्यांचे रेशनकार्ड आँनलाईन करुन द्यावे.तसेच जे रेशनकार्ड धारक आँनलाईन करण्यासाठी आपल्या कार्यालयाला अर्ज करतात त्यांचे आँनलाईन वेळेत होत नसल्याने त्यांची उपासमार व गैरसोय होऊ लागली आहे.तसेच तालुक्यातील वंचीत असणाऱ्या रेशनकार्ड धारकांची शोधमोहीम राबवून त्यांचे कार्ड आँनलाईन करून द्यावे व त्यांच्या हक्काचा रेशनचा माल उपलब्ध करून द्यावा.आशी मागणी करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर मानवहीत लोकशाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे,कळंब तालुकाध्यक्ष धनंजय ताटे,सामाजिक कार्यकर्ते किशोर वाघमारे यांच्या स्वाक्षर्या आहेत.