तुळजापूर / प्रतिनिधी-
 जिल्हयात सोमवारी कोरोनाचे ७ रुग्ण सापडले आहेत तर एका तुळजापूर शहरातील कोरोनाग्रस्त ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला त्यामुळे मतांचा आकडा १० झाला आहे.
उस्मानाबाद शहरातील एमआयडीसी भागात नव्याने ३ रुग्ण सापडल्याने हा भाग हॉटस्पॉट बनत चालला आहे. तुळजापूर शहरात एक रुग्ण सापडला असून तो पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहे तर दुसरा रुग्ण काटगाव येथील आहे.उमरगा शहरातील बालाजी नगर भागात २ नवीन रुग्ण सापडले असुन ते पूर्वीच्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉराजाभाऊ गलांडे व डॉसतीश आदटराव यांनी दिली. उस्मानाबाद जिल्हयात कोरोनाचे २१७ रुग्ण असून त्यापैकी १६८ जण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत तर ३९ जणांवर उपचार सुरू आहेत आजवर १० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. उस्मानाबाद जिल्हयात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर ४.६० टक्के इतका आहे तर उपचारानंतर रुग्ण बरे होण्याचा दर ७७.४१ टक्के आहे.

 
Top