नळदुर्ग  /प्रतिनिधी-
 शहरात 31 मे रोजी कोरोनाचा पॉझिटिव रुग्ण आढळून आल्यानंतर मुलतान गल्ली ला कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन सील करण्यात आले आहे. मात्र सील करण्यात आलेल्या मुलतान गल्ली मध्ये हातावर पोट असलेल्या गोरगरीब बांधकाम  व सेंटरिंग मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे त्या भागातील मजूर कोरोनाच्या प्रादुर्भाव पासुन बचावासाठी प्रशासनाने केलेल्या सूचनेचे पालन करीत दोन महिन्यापासून घरीच आहेत. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ नये म्हणून एम. एम. मार्केटिंग मालक सैफन शेख यांच्यावतीने त्या भागातील 90 गोरगरीब गरजुवंत लोकांना तांदूळ ,गहू आटा, मसूर डाळ, साखर, तेल पाकीट, शेंगदाणे, मिरची पॉकेट, हळद पाकीट, मीठ पाकीट, जिरे यांच्यासह इतर साहित्य असलेले किराणा मालाचे किट व  भाजीपाला तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नगरसेवक शहेबाज काझी, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कमलाकर चव्हाण, एम एम मार्केटिंग चे  मालक सैफन शेख  मंडळ अधिकारी अमर गांधले तलाठी तुकाराम कदम, पत्रकार लतीफ मामा शेख, आयुब शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्रम शेख, अब्दुल शेख, गौस शेख, रफिक फुलारी, वाजीद वळसंगकर, साजिद शेख निजाम बागवान, कुदरत शेख, तानाजी गायकवाड, लक्ष्मण गायकवाड, इस्माईल शेख, इरफान शेख हजरत शेख, कुमार सुरवसे मजिद बागवान यांच्यासह इत्यादी जण उपस्थित होते.
प्रशासनाकडून या भागातील लोकांना लवकरच किराणा मालाच्या किटाचे वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर शहरातील  राजकीय, सामाजिक शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या संघटना व व लोकांनी अशा संकटकालीन परिस्थितीमध्ये या भागातील गोरगरीब गरजुवंत लोकांना किराणा मालाच्या किटाचे वाटप करुन मदतीचा हात पुढे करावे असे आवाहन तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे, त्याचबरोबर रहीम नगर भागातील नुरानी ग्रुपच्यावतीने कंटेनमेंट झोन मधील गोरगरीब गरजुवंत 40 कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप हाफेज सय्यद नियामतुल्ला इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याकरिता खालेद इनामदार,आलीम शेख, सादेख काजी, मुर्तुझा शेख, मजीद इनामदार, सलाम कुरेशी, जावेद शेख, ,मुदस्सर शेख यांच्यासह नूरानी ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
Top