उमरगा /प्रतिनिधी-
राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्रजी पवार यांच्या विषयी अपशब्द वापरणाऱ्या गोपीचंद कुंडलीक पडळकर रा. पडळवाडी पो. पिंपरी ता. आटपाडी जि. सांगली या माथेफिरु आमदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली उमरगा पोलीस निरीक्षक यांना तक्रार देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, भारतीय जनता पक्षाच्या गोपिचंद पडळकर नावाच्या माथेफिरु आमदाराने आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या बद्दल झी २४ तास या वृत्तवाहीणीवर अपशब्द वापरुण अवमाण केला आहे. या अक्कलशुन्य आमदाराने जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला असुन निव्वळ प्रसिद्दीच्या हव्यासापोटी अपशब्द वापरुण कार्यकत्यांच्या भावणा दुखावल्या आहेत. तरी या माथेफीरुवर गुन्हा दाखल करुण मानसोपचार तज्ञास दाखवावे असा सल्लाही यात देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, प्रा सतीश इंगळे, प्रदेश सदस्य गोविंदा साळुंखे, इंद्रजित घोडके, विधानसभा कार्याध्यक्ष अमोल पाटील , सरपंच मशोद्दीन जमादार, सरपंच रणजीत गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष राहुल बनसोडे, बंजारा सेल जिल्हा कार्याध्यक्ष प्रताप राठोड, दीपक हिप्परगे, प्रभात शिंदे, हरीश शिवनेचारी, कपिल चव्हाण, धर्मराज व्हनाळे, शहर कार्याध्यक्ष फैयाज पठाण आदींच्या सह्या आहेत.
 
Top