उस्मानाबाद/प्रतिनिधी
 येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात “नॅक” संदर्भात उस्मानाबाद जिल्ह्याच्या, महाविद्यालयातील प्राचार्य व आय.क्यु.ए.सी.चे समन्वयक आणि प्राध्यापक तसेच नाॅन टिचिंग कर्मचारी यांना बदलत्या काळात “नॅक” मूल्यांकनावेळी सामारे जाण्यासाठी मार्गदर्शन व्हावे या उद्देशाने दि.११ जून रोजी, एक दिवसीय आॅनलाईन वर्कशाॅप घेण्यात आला. हा वर्कशाॅप रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील आय.क्यु.ए.सी विभाग व सहसंचालक उच्च शिक्षण, विभागीय कार्यालय, औरंगाबाद आणि रूसा महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला.
या वर्कशाॅपमध्ये सुरवातीला आय.क्यु.ए.सी समन्वयक डॉ. ए. बी. इंदलकर यांनी वर्कशाॅप आयोजनाचा उद्देश विषद करून सर्व सन्मानिय मार्गदर्शक संशोधन मान्यवरांची ओळख करून दिली. त्यानंतर महाविद्यालयाची ओळख व कार्य याबद्दलची माहिती प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी करून दिली. तर स्वागतीय मार्गदर्शन डाॅ.डी.डी गायकवाड (सहसंचालक उच्च शिक्षण विभाग ,औरंगाबाद) यांनी केले. वर्कशाॅपचे नियोजन प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख व  महाविद्यालयातील डॉ.ए.बी. इंदलकर (आय.क्यु.ए.सी.चे  समन्वयक ) यांनी केले होते. डाॅ.ए. बी.इंदलकर यांनी “आॅनलाईन वर्कशाॅपचा” हेतु सूरवातीलाच आपल्या प्रास्ताविकातून सांगितला. या वर्कशाॅपची संकल्पना डॉ. प्रमोद पाब्रेकर( रुसा आॅफिसर,महाराष्ट्र शासन, मुंबई) यांनी सांगितली . या वर्कशॉप मध्ये डाॅ.शिल्पा सप्रे यांनी मार्गदर्शन केले. तर डॉ. श्रीहरी पिंगळे यांनी “डॉक्युमेंट आणि नॅक” या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. विजय जोशी यांनी “महाविद्यालयातील नॅक संदर्भात आय.क्यु.ए.सी.चा रोल” या विषयावर मार्गदर्शन केले. सूञसंचालन डाॅ.फुलसागर सर यांनी केले. या आॅनलाईन वर्कशॉप मध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील प्राचार्य, प्राध्यापक,नाॅन टिचिंग कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा  वर्कशाॅप उस्मानाबाद जिल्ह्यापूरता मर्यादित आसतांनाही राज्यातील विविध महाविद्यालयातील प्रांध्यापकांनी सहभाग नोंदवला.  तर झुम मिटिंगवर द्वारे १७७ जणांनी पाहिले,  २३९ जणांनी यु.ट्युबवरून हा वर्कशाॅप पाहिला. समारोप प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख यांनी केला. तर आभार डाॅ.जीवन पवार यांनी मानले, या वर्कशाॅपासाठी श्री. मयुर व्हटकर, श्री. प्रमोद उमटे यांनी सहकार्य केला.
 
Top