उस्मानाबाद  /प्रतिनिधी -
उस्मानाबाद शहरातील प्रेस फोटोग्राफर कालिदास अंबादास म्हेत्रे यांच्या पत्नी सौ. सुवर्णा कालिदास म्हेत्रे (वय 50) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (दि.9) सकाळी बँक कॉलनी येथील राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर पत्रकार बांधवांनी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी म्हेत्रे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करुन श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, सासरे असा परिवार आहे.

 
Top