लोहारा/प्रतिनिधी
राष्ट्रीयकृत बँका मनमानी करत असून शेतक-यांना पिक कर्जपुरवठा करीत नसुन कर्जपुरवठा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांचे निवेदन भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे.
 या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद  जिल्ह्यातील लोहारा तालुका अविकसित तालुका असुन या ठिकाणी शेतकऱ्यांना कायमस्वरूपी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना पीक विमा, पीक कर्ज, पासून कायमच वंचित रहावे लागत आहे. हे दुर्देव आहे. शासन याबाबतीत धोरणात्मक निर्णय घेत असताना तरीदेखील लोहारा तालुक्यातील अचलेर, आष्टा कासार, लोहारा, भोसगा, दस्तापूर, सह  इतर ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र ग्रामीण बँक शेतकऱ्यांना चालू वर्षाचे पीक कर्जाचा व *सन  2018 - 19  मधील तुर व इतर पिके जेवळी, लोहारा सर्कल मधील शेतकऱ्यांना पीक विमाचा  लाभही मिळाले नाही. तसेच शासन धोरणानुसार कर्जमाफीचे अनेक प्रस्ताव प्रशासनाच्या दिरंगाईमुळे प्रलंबित आहेत. तसेच लोहारा शहर व तालुक्यात प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचया दुस-या टप्प्यातील घरकुल मागणी कुटुंब धारकांच्या प्रस्तावाला मान्यता त्वरीत देणयात यावी, तसेच सांगायो श्रावणबाळ, विधवा निराधार, अपंग, दृष्टीहीन, व्यक्तीकरता या योजनेवरील मानधनासाठी पात्र होण्यासाठी 21 हजार रूपयांची उत्पन्नाची अट आहे. हि रद्द करुन ती 50 हजार रु उत्पन्नाची अट करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटिल, माजी तालुकाध्यक्ष विक्रांत संगशेटटी, ओबीसी तालुकाध्यक्ष दगडु तिगाडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष बालजी चव्हाण, बालसिग बायस, नितिन दंडगुले, आदि, पदाधिकारी उपसथित होते.

 
Top