लोहारा/प्रतिनीधी
लोहारा तालुक्यातील मोघा बु येथे दि. 08 जून 2020 रोजी बी.बी.एफ पद्धतीने पेरणी प्रशिक्षण घेण्यात आले. या प्रशिक्षण शिबिरात बी.बी. एफ पद्धतीने सोयाबीन पेरणी केल्यास बियाण्याची बचत होते. पिकाची वाढ जोमदार होते. पावसाचा खंड पडल्यास पिकावर अनिष्ट परिणाम होत नाही. अतिरिक्त पाऊस झाल्यास पाण्याचा उत्तम निचरा होत असल्याने पिकाच्या वाढीवर वाईट परिणाम होत नाही.  रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. फवारणी सारखी कामे अगदी सहज करता येतात. दाण्याची गुणवत्ता चांगली मिळते त्यामुळे अपेक्षित उत्पादनात 20 टक्के पर्यंत वाढ होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी याच पद्धतीने पेरणी करण्याचे व आंतरपिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश करण्याचे आवाहन कृषी सहाय्यक ओ. एच. पाटील यांनी केले. व तसेच समूह सहाय्यक आर.जी.आगळे यांनी 5 टक्के निंबोळी अर्का बाबत व पोकरा योजना सद्यस्थिती बाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी बी.बी.एफ पद्धतीने पेरणी प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. व उपस्थितांचे आभार मानून प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. या प्रशिक्षणासाठी शेतकरी  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top