नळदुर्ग /प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्याचे  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नळदुर्ग येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.यावेळी त्यांनी येणाऱ्या काळात नळदुर्ग शहरांतील नागरीकांनी सतर्क राहावे असे सांगितले. दि.२ जुन रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नळदुर्ग शहरातील कोरोना बाधित रूग्ण आढळुन आलेल्या प्रतिबंधीत परिसरला भेट देऊन त्या परिसराची पाहणी केली. नागरीकांनी घाबरून न जाता प्रशासनाने केलेल्या सुचनांचे पालन करावे त्याचबरोबर प्रतिबंधीत भागांतील नागरीकांना आयुष्य मंत्रालयाने रोगप्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम ३० या गोळ्यांचे वाटप करावे या गोळ्या आपण उपलब्ध करून देऊ.त्याचबरोबर नळदुर्ग करांनी येणाऱ्या काळात सतर्क राहुन मुंबई, पुणे व ठिकाणाहून येणाऱ्या नागरिकांची माहीती प्रशासनास द्यावी असेही त्यांनी यावेळी सांगितले.  प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या जेवणाच्या डब्याबाबत तहसीलदार व न प कर्मचाऱ्याना त्यांनी विचारणा केली
तसेच नळदुर्गकराणी येणाऱ्या काळात कोरोना बाधित रुग्णाप्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या असे सांगितले यावेळी तहसिलदार सौदागर तांदळे, वैद्यकीय अधिकारी, न प कर्मचारी, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोहर वानखेडे, शिवसेनेचे शहरप्रमुख संतोष पुदाले, उपतालुकाप्रमुख सरदारसिंग ठाकूर,शिवसेनेच्या मिडिया सेलचे शहर अध्यक्ष सुनिल गव्हाणे, शाम कणकधार, राजुसिंग ठाकूर, हे सोशल डिस्टन्स पाळून उपस्थित होते

 
Top