उस्मानाबाद /प्रतिनिधी-
सध्या देशात व राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग ट्रक, ॲटोरिक्षा, टॅक्सी इत्यादी  वाहन चालकांना होऊ नये. यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज दि. 2 जून 2020 रोजी रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारे आर्सेनिक अल्बमच्या 30 गोळ्यांच्या वाटपाची मोहिम घेण्यात आली.
या मोहिमेत 1. एम. के. हॉल, खाजानगर, तुळजापूर रोड, उस्मानाबाद  2. बसस्टँडजवळ, सांजा रोड,  3. बार्शी नाका. 4. तेरणा महाविद्यालय, उस्मानाबाद या ठिकाणी  एकूण 300 ट्रक, ॲटोरिक्षा, टॅक्सी इत्यादी वाहन चालकांना आर्सेनिक अल्बमच्या 30 गोळ्यांचे वाटप करण्यात आले .
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी  श्री.गजानन नेरपगार, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या  मार्गदर्शनाखाली श्री. युनूस सय्यद, मोटार वाहन निरीक्षक व श्री.शेखर आचार्य, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक यांनी परिश्रम घेतले. तसेच श्री.मैनोद्यीन पठाण, अध्यक्ष, जिल्हा मोटार मालक असोसिएशन, उस्मानाबाद यांनी सहकार्य केले.

 
Top