नळदुर्ग / प्रतिनिधी-
 दिवसेंदिवस कोरोना विषाणूचा धोका वाढत चालल्याने नागरीक व अधिकाऱ्यांनी आता गाफील राहू नये, मुंबई, पूणे सह इतर शहरातून आपल्या गावात येणाऱ्या प्रत्येक नागरीकांना सक्तीने क्वॉरंटाईन करावे अशा सक्त सुचना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी नळदुर्ग येथील प्रतिबंधीत क्षेत्राला आज दि. १० जून रोजी भेट दिल्यानंतर बोलताना केल्या.
दि. ९ जून रोजी नळदुर्ग शहरातील बौध्द नगरात दोन कोरोना पॉझीटीव्ह रुगण आढळून आले आहेत. या भागातील या व्यक्ती असल्याने पालिका प्रशासनाने दि. ९ जून रोजी रात्रीच बुध्दनगर परिसर पूर्णपणे सील करुन हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. यावेळी त्यांच्या सोबत जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मीता कांबळे, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष नितीन काळे, नगरसेवक नय्यर जहागिरदार, उदय जगदाळे, दयानंद बनसोडे, निरंजन राठोड, नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे, मंडळ अधिकारी मोहन गांधले, पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक श्री कुंभार, तलाठी कदम आदी उपस्थीत होते. यावेळी आमदार श्री पाटील यांनी म्हटले की, रेड झोन मधुन आलेल्या कुठल्याही व्यक्तींवर दया माया न दाखविता त्यांना प्रथम क्वॉरंटाईन करावे, बाहेरुन आलेल्या प्रत्येक नागरीकांची माहीती स्थानीक नागरीकांनी प्रशासनाला दयावी, सया कोरोनाचा धोका वाढत चालला आहे, प्रशासन व नागरीकांनी आता गाफील न राहता स्वत:ची काळजी स्वत: घेवून कोरोनाचा मुकाबला करावा असे त्यांनी यावेळी म्हटले आहे. त्यामुळे आता प्रशासनाने या बाबत तात्काळ पावले उचलणे गरजेचे झाले आहे. कारण शहरात दररोज कोणत्या ना कोणऱ्या शहरातून नागरीक येत आहेत, परंतु त्यांची माहीती प्रशासनाला दिली जात नाही त्यामुळे आता प्रशासनाने सजग राहून बाहेरुन आलेल्या रेड झोन मधील नागरीकांनी नळदुर्ग शहरात प्रवेश करताच त्यांना क्वॉरंटाईन करणे जरुरीचे झाले आहे.
 
Top