उस्मानाबाद / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद तालुक्यातील पाडोळी येथे दि. 11 जून 2020 रोजी  बालिकेचा बालविवाह आयोजित करण्यात आला होता. याची माहिती  मिळताच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  बी. एच. निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अमोल कोवे यांच्या सुचनेनुसार जिल्हा महिला व बालविकास विभागाने ताबडतोब घटना स्थळी जावून या घटनेची शहनिशा करुन अल्पवयीन बालिका वधू व बालक वर यांच्या संबंधित कुटुंबाला समुपदेशन केले व मुलीचे 18 वर्ष व मुलाचे 21 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय  लग्न करणार नाही, असे हमीपत्र पालकांकडून लिहून घेतले व बाल विवाह रोखण्यात आला.
यावेळी बाल संरक्षण अधिकारी  श्रीमती  विभावरी  खुने, समुपदेशक श्रीमती कोमल धनवडे, सामाजिक कार्यकर्ता योगेश शेगर, क्षेत्रीय कार्यकर्ता श्रीमती जयश्री पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल कांबळे, पर्यवेक्षिका श्रीमती सी. डी. शिंदे, आयसीडीचे विस्तार अधिकारी किशोर वंजारवाडकर, पोलीस  कर्मचारी  डी. एम. काळे, ग्रामसेवक भोईटे, एन. के. पाडोळी, एम. डी. देवकते, मेंढा, पाडोळीचे पोलीस पाटील धनाजी  गुंड, मेंढाचे पोलीस पाटील योगेश माळी, मेंढाचे सरपंच सौ. शशिकला कांबळे, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब जावळे, सविता ठाकरे पाडोळी, शेटे बी. बी., अंगणवाडी कार्यकर्ता मेंढा, शरद पवार नागरिक पाडोळी यांच्यासह कर्मचारी व गाव बाल संरक्षण समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
 
Top