कळंब / प्रतिनिधी-
मतदार पडताळणी  कार्यक्रम अंतर्गत नियुक्त यादी भागातील मतदारांच्या घरोघरी भेटी देऊन मतदार पडताळणीचे, नवीन मतदार नोंदणी करणे, दुरुस्ती करणे  व वेळोवेळी होणाऱ्या विविध निवडणूक कार्यक्रमात संगणकीय उत्कृष्ट काम केल्याबद्दल श्री. नारायण बाकले यांचा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार श्रीमती मंजुषा लटपटे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
   यावेळी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार श्रीमती परविन पठाण,  निवडणूक विभागाचे खलील सय्यद आदीजण उपस्थित होते. या सन्मानाबद्दल श्री बाकले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
 
Top