कळंब (प्रतिनिधी) -
जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षा २०२० मध्ये नगर परिषद प्राथमिक शाळा क्र. २ कळंब  ता कळंब शाळेने अभूतपूर्व यश संपादन केले आहे, या प्रवेश परीक्षेत शाळेचे दोन विद्यार्थी प्रवेश पात्र झाले आहेत.
जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा २०२० मध्ये नगर परिषद शाळेने यश संपादन केले आहे. यामध्ये कु. सुधांशू सचिन भांडे व कुमारी वैष्णवी विजय बोबडे हे नवोदय विद्यालय तुळजापूर येथे सहावी प्रवेशासाठी पात्र झाले आहेत. या विद्यार्थ्यांवर वर्गशिक्षिका श्रीमती सोनाली पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले असून यासाठी शाळेचे मुख्याध्यापक मुकुंद नांगरे व सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. या यशा बद्दल नगराध्यक्षा सुवर्णाताई मुंडे, उप नगराध्यक्ष तथा शिक्षण सभापती संजय मुंदडा सर्व नगर सेवक व मुख्याधिकारी अनुप दुर्वे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्य, पालक यांनी अभिनंदन केले आहे.
 
Top