वाशी /प्रतिनिधी
सध्या कोरोनाचं संकट फैलावत असताना आणि आजतागायत त्यावर कोणतेही औषध किंवा लस सापडलेली नाही, त्यामुळं आता आपणास या रोगासोबतच जगण्याची सवय करून घ्यावी लागेल आणि त्यामुळंच सर्वांची रोगप्रतिकार शक्ती वाढणं अतिशय महत्वाचा आहे. ज्याची प्रतिकार शक्ती चांगली आहे त्याला कोरोना झाला तरी तो लवकर बरा होतो. कोरोनाशी लढण्यासाठी शारीरिक तयारी होते.केंद्रीय आयुष मंत्रालयाने आर्सेनिक अल्बम-30  औषधाने रोगप्रतिकार शक्ती वाढते अशी शिफारस केली. त्यामुळे सतत सामाजिक बांधिलकी जपणारे आणि समाजासाठी धडपडणारे संभाजी ब्रिगेड वाशी तालुकाध्यक्ष आशिष पाटील यांनी जवळका येथे गावकऱ्यांमध्ये आर्सेनिक गोळ्यांचे वाटप स्वखर्चातून स्वहस्ते केले.
यावेळी वाशी येथील आधार हॉस्पिटल चे संचालक होमिओपॅथी तज्ञ डॉ.अक्षय इंगोले यांनी गावकऱ्यांना गोळ्यांच्या सेवना बाबतीत व त्यापासून होणाऱ्या फायद्या बाबत लोकांना मार्गदर्शन केले, तर गोळ्यांचे वाटप करताना ग्रामपंचायत सदस्य,भाऊसाहेब नाळपे,गणेश नाळपे,सुनील आडमुठे,सचिन नाळपे,सुशांत नाळपे,राहुल आडमुठे,समाधान नाळपे,दत्ता नाळपे, मा.सरपंच युवराज आडमुठे हे उपस्थित होते.
 
Top