उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 शहरातील सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील सर्व डॉक्टर्स, कर्मचारी आणि रुग्णांचे स्वब तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत त्यामुळे येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी चिंता मिटली आहे. कोरोनाबाधित महिला येथे येऊन गेल्याच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटल इमारतीचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. रुग्णालयाची आरोग्ययंत्रणा पूर्वीप्रमाणे कार्यान्वित झाली असून निदान व उपचाराचे कामकाज सुरळीतपणे सुरूअसल्याची माहिती सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.वसुधा दिग्गज दापके-देशमुख यांनी दिली.
सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स हे उस्मानाबाद जिल्हयातील सर्व प्रकारच्या आजारांचे निदान आणि उपचारासाठी सर्व सोयीयुक्त असे प्रसिद्ध रुग्णालय आहे. या रुग्णालयात शहरातील एक गर्भवती महिला उपचाराची चौकशी करण्यासाठी येऊन गेली होती, त्याच बरोबर ती महिला अन्य हॉस्पिटलमध्येही जाऊन आली. लातूर येथे तपासणीच्यावेळी ती महिला कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले होते त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स, कर्मचारी आणि त्यावेळी असलेल्या रुग्णांना क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला होता तसेच हॉस्पिटल 24 तासांसाठी बंद ठेवून संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. आरोग्य प्रशासनाने सहयाद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्समधील डॉक्टर्स, कर्मचारी आणि त्यावेळी असलेल्या रुग्णांचेही स्वब तपासणीसाठी पाठविले होते. या सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत त्यामुळे हॉस्पिटल व्यवस्थापनासह यापुढे उपचारासाठी येणान्या रुग्णांनी घाबरण्याचे कारण नाही. रुग्णालयात निदान व उपचाराचे कामकाज पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आले असून कोणत्याही प्रकारची शंका मनात न ठेवता रुग्ण पूर्वीप्रमाणे रुग्णालयात उपचारासाठी येऊ शकतात, असे डॉ.दापके-देशमुख यांनी सांगितले.

 
Top