तुळजापूर / प्रतिनिधी-
 उस्मानाबाद जिल्हयात बी-बियाणे , खते यांची कृञिम टंचाई निर्माण करुन शेतकऱ्यांची अर्थिक पिवळणूक करीत असल्या प्रकरणी   लक्षवेधण्यासाठी व बळीराजा चेतना अभियान  घोटाळा प्रकरणी संबधितांन वर योग्य कारवाई करण्याचा मागणी साठी स्वाभीमानीशेतकरीसंघटनेने आक्रमक भूमिका घेवुन तिर्थक्षेञ तुळजापूर ते पालकमंञी निवासस्थान अशी   सोशल डिस्टंन्सिंग पाळुन आक्रोश दिंडी 22जुन पासुन काढण्यासाठी  साठी परवानगी देण्याची मागणी तुळजापूर तहसिलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देवुन केली आहृ
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की,बँक अधिकारी शेतकऱ्यांना दारात उभे करीत नाहीत तसेच दलाला मार्फत कमिशन घेवुन कर्ज वाटप करीत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी वारोंवार हेलपाटे मारुन ही कर्ज मिळाले नाही त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी सावकार मार्फत कर्ज काढुण शेतीची मशागत  करावी लागत आहे. जिल्हयात बिबियाणेखते यांची कृञिम टंचाई करुन विक्रेते जादा दराने बिबियाणेखते विक्री करुन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत या कडे प्रशाषणाचे लक्ष नाही. उस्मानाबाद जिल्हयात बळीराजा चेतना अभियनात झालेल्या घोटाळ्यातील  संबंधित वर अधाप कारवाई  झाली नाहि तर  त्यावर कठोर कारवाई करुन संबंधितांना निलंबित करावे अशा आशयाचे  निवेदन स्वाभीमानीशेतकरीसंघटना जिल्हाअध्यक्ष रविंद्र इंगळे राजेंद्र हाके धनाजी पेंदे गुरुनाथ भोजणे संतोष भोजणे यांनी दिले
 
Top