तुळजापूर / प्रतिनिधी-
कोरोनाचे संकट संपूर्ण देशभर आणि राज्यभर चालूच आहे असे असताना सुद्धा मास्क लाऊन, सोसिअल डीस्टसिंग पाळून, सॅनिटायझेशन चा वापर करत हा लसीकरणाचा कार्यक्रम चालू आहे. तरी तुळजापूर तालुक्यातील सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाला लसीकरण करून घ्यावे असे आवाहन    पंचायत समिती उपसभापती चित्तरंजन सरडे यांनीही केले आहे.
मंगरूळ येथे मोठी जनावरे व शेळ्या - मेंढ्या मध्ये रोग प्रतिबंधात्मक लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी उपसभापती सरडे बोलत होते. सदर कार्यक्रमास सरपंच सत्तार जाफर मुलाणी, वृणोपाचारक वाघमारे, शंकर यमगर, व इतर पशुपालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमामध्ये सोशल डिस्टन्स पाळून लसीकरण करण्यात आले.
आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या पशुधनाच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. यासाठी पशुसंवर्धन विभागाचे पशुधन विकास अधिकारी व कर्मचारी पशुपालकांना वारंवार आवाहन करून पावसाळ्यात जनावरांना होणाऱ्या साथीच्या रोगांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.

 
Top