तुळजापूर /प्रतिनिधी
 तुळजापूर तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस न पडल्याने खरीप पेरणीसाठी शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.तुळजापूर तालुक्यात पावसाची सरासरी 802.54 मिमि असुन आजपर्यत 49.9 मिमि पाऊस जाला आहे.  तालुक्यात खरीपाचे पेरणी क्षेत्र सरासरी 79300 हेक्टर असताना 101598 हेक्टर क्षेत्रात खरीप पेरणी होईल यात सर्वाधिक पेरणी सोयाबीनची होईल,अशी शक्यता गृहीत धरुन कृषी खात्याने नियोजन केले आहे.
कृषी खात्याचा मते खरीप पेरणीसाठी जमिनीत योग्य ओल निर्माण होण्यासाठी 100 मिमि पावसाची आवश्यकता आहे.  त्यामुळे शंभर मिमि पाऊस झालातरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी अधिकारी गायकवाड यांनी केले आहे.सध्या पेरणी योग्य पाऊस न झाल्याने खरीप पेरणीसाठी राने तयार केली असुन पाऊस तितकासा न पडल्याने खरीप पेरणीचा श्रीगणेशा शेतकऱ्यांनी केला नाही. कोरोना लाँकडाऊन केल्यानंतर मशागत कामे थांबली होती.काही दिवसानंतर प्रशासणाने शेती कामांना मुभा दिल्याने मशागत कामे शेतकऱ्यांनी ट्रँक्टर सहाय्याने  पुर्ण केली. यंदा कोरोनाचा काळात ही शेतकऱ्यांनी खरीप पेरणीसाठी जीव धोक्यात घालुन राने तयार केली
 तालुक्यात काही विभागात मान्सुनपुर्व पाऊस बरसला तो समाधानकारक नसल्याने शेतकरी पावसाची वाट पहात बसला आहे.  जरी हवामान खात्याने चांगला पाऊस होण्याचाअंदाज वर्तवला असला तरी ऐन वेळी वा-या मुळे पाऊस पुढे जात आहे. मृग नक्षत्रास रविवार पासुन आरंभ झाला आहे, रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते त्यामुळे वेळेवर दमदार  मृग नक्षञाचा पाऊस झालातरच शेतकऱ्यांना खरीप पेरणी करता येणार आहे. नाहीतर नियोजन चुकणार आहे. एक तर शेतकरी सध्या आर्थिक संकटात आहे कोरोनामुळे करण्यात आलेल्या लाँकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळाला नाही. त्यामुळे कोरोनाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. खरीप पेरणी वेळेवर झाली तर शेतकऱ्यांना अर्थिक नफा मिळणार आहे. नाहीतर उत्पादनावर त्याचा परिणाम होणार आहे. खरीप पेरणीत प्रामुख्याने सोयाबीन उडीद, मुग, तुर ही पीके तालुक्यातील शेतकरी घेतो या पिकांच्या काढणीनंतर ज्वारी, हरभरा, कांदा,गव्हाची लागवड केली जाते.  सध्या रात्री थंडीचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे हवामान खात्याने 7 जुन नंतर पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी पाऊस कधी पडेल हे सांगणे कठीण बनले आहे.

 
Top