नळदुर्ग  /प्रतिनिधी
 तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील गरीब कुटूंबाना शिवसेनेच्या वतीने कै. पवनराजे निंबाळकर यांच्या जयंती निमीत्त खासदार ओमराजे निंबाळकर  यांच्या वतीने अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले आहे.
लॉकडाउनमुळे सर्व काम धंदे बंद असल्यामुळे गोर गरीब कुटूंबाचे मोठे हाल होत आहेत, अशा कठीण प्रसंगात उस्मानाबाद जिल्हयातील एक ही कुटूंब अन्नधान्यापासून वंचीत राहू नये याची दक्षता शिवसेनेचे जिल्हयाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे घेत आहेत, त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून जिल्हयाती प्रत्येक गरजू कुटूंबापर्यंत मदत पोहंचविण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले आहेत. दि. ६ जून रोजी तुळजापूर तालुक्यातील येडोळा येथील गरीब कुटूंबाना शिवसेनेच्या वतीने कै. पवनराजे निंबाळकर यांच्या जयंती निमीत्त खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या वतीने देण्यात येत आसलेल्या अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख ॲन्ड अशीष सोनटक्के, विभाग प्रमुख अनिल छत्रे, गावच्या उपसरपंच लक्ष्मी राजेंद्र जाधव, ग्राहर संरक्षण कक्षाचे तालुका प्रमुख मेजर राजेंद्र जाधव यांच्या हस्ते गरजूंना किटचे वाटप करणत आले आहे.

 
Top