तेर
/प्रतिनिधी
महीला पोलिस पाटील असतानाही प्रत्येक कामात दक्ष रहात असल्याने कर्तव्यदक्षतेमुळे तेरच्या  महीला पोलिस पाटील यांचे नागरीकामध्ये कौतूक होत आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे रीक्त असलेल्या पोलिस पाटील यांचे पद 2011 भरण्यात आले.यामध्ये पेालिस पाटील म्हणून फातिमा मज्जित शेख -मनियार यांची नियुक्ती शासनाकडून करण्यात आली.महीला पोलिस पाटील आसल्याने त्या कश्याप्रकारे काम करतात याकडे तेरकरांचे लक्ष लागले होते.परंतु महीला पोलिस पाटील फातिमा मनियार यानी शासनाने दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करण्यास हीरीरीने सुरूवात केली.तेरमध्ये घडलेल्या घटनेच्या ठीकाणी तात्काळ उपस्थीत राहून लोकशाही पद्धतीने काम करण्यास सुरूवात केली.विविध घटनेचा पंचनामा,प्रशासनाकडे सत्यस्थीतीचा अहवाल तसेच नागरीकांना चारीञ्याचा दाखला तसेच विविध ठीकाणी आयेजित केलेल्या बैठकीस उपस्थीती यामुळे महीला पोलिस पाटील असूनही कामाची तत्परता यामुळे पोलिस  व महसूल विभागाचे वरीष्टही तेरच्या महीला पोलिस पाटील फातिमा शेख-मनियार यांच्या कामाचे कौतूक करतात.

 
Top