उस्मानाबाद /प्रतिनिधी-
तालुक्यातील बेंबळी प्राथमिक आरोग्य केंद्रात दारू पिऊन गोंधळ घालत तेथील कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून अॅट्राॅसिटीची केस करण्याची धमकी देणाऱ्या एकाविरोधात बेंबळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
ही घटना दि.२२ जून रोजी रात्री ९.१५ वाजेच्या सुमारास घडली. डॉ. रोहित राठोड हे आरोग्य केंद्रात कर्तव्यावर असताना अमर महादेव कांबळे (रा. बरमगांव) हा मद्यधुंद अवस्थेत आरोग्य केंद्रात आला व आरडा-ओरड करून गोंधळ घालत अॅट्रॉसिटी करण्याची धमकी दिली. याप्रकरणी डॉ. राठोड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.