उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 कोळेवाडी (ता.उस्मानाबाद) येथील जरीचंद दगडू कांबळे यांना मारहाण केल्याच्या कारणावरुन कोळेवाडीतील तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कांबळे शेतात जात असताना गावातीलच बाळू फुलचंद कांबळे, फुलचंद दगडू कांबळे ,शंकूतला फुलचंद कांबळे यांनी मारहाण केली.अशा प्रकारची फिर्याद कांबळे यांनी दिल्यावरून वरील तिघावर ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बीफ अमंलदार प्रकाश राठोड करीत आहेत.

 
Top