लोहारा/प्रतिनिधी
गरोरदर पत्नीला भेटण्यासाठी लोहारा शहरात येऊन गेलेला जावाई लातूरमध्ये कोरोना पॉझिटीव्ह निघाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नगरपंचायतने शहरातील प्रभागा 16 सिल करून रूग्णाच्या संपर्कात आलेल्या गरोदर पत्नीसह पाच जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान या परिसरातील नागरिकांनी किमान चार दिवस घरा बाहेर पडू नेये, अन्यथा पोलिस कारवाई करण्यात येईल, अशी दवंडी नगरपंचायतीकडून  देण्यात आली आहे.
आपल्या गरोदर पत्नीला भेटण्यासाठी लातूरहून एक तरूण दिनांक 24 जून 2020 रोजी दुपारी बाराच्या सुमारास शहरात आला. परजिल्ह्यातून एक जण आल्याची कळल्याने काही सजग नागरिकांनी याबाबत दिनांक 25 जून रोजी नगरपंचायत प्रशासनाला माहिती दिली. प्रशासनाने तत्काळ संबंधित तरूणाशी संपर्क करुन त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. त्यावेळी ताप असल्याने तरूणाला क्वारंटाइन होण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. परंतु त्यांनी नकार देत लातूरला निघून गेले. लातूरला गेल्यानंतर त्यांना अस्थव्यस्थ वाटू लागल्याने गुरूवारी रुग्णालयात दाखल करुन घेऊन स्वॅब घेण्यात आला. दिनांक 27 जून रोजी सकाळी कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा रिपोर्ट आला. त्यानंतर लातूर महानगरपालिकेने खबरदारी घेत ते कुणा कुणाच्या संपर्कात आले होते. यांची विचारपुस केली असता लोहाऱ्याला गेल्याचे तरूणाने सांगितले. त्यानंतर लगेच महानगरपालिकेने लोहारा नगरपंचायतचे कर्मचारी बाळू सातपुते यांच्याशी संपर्क करुन लोहाऱ्यात आलेली व्यक्ती लातूरमध्ये कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याचे सांगितले. त्यानंतर नगरपंचायतचे मुख्यधिकारी गजानन शिंदे यांनी खबरदारी बाळगत शुक्रवारी शहरातील ईदगा मशीद परिसर सिल करण्यात केला आहे. दरम्यान बाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या घरातील तीन जणांना शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर गरोदर पत्नी व अन्य एका महिलेला होम क्वारंटान करण्यात आले आहे. गरोदर पत्नीचा स्वॅब घेण्यात आला असून उर्वरित चौघांचे स्वॅब सोमवारी घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

 
Top