उस्मानाबाद/ प्रतिनिधी
 लोहारा तालुक्यातील दस्तापूर येथे रस्ता ओलांडणाऱ्या वृद्ध महिलेला दुचाकीची धडक दिल्यामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभद्राबाई दशरथ वाकळे (६४) दस्तापुर येथील राष्ट्रीय महामार्गावर पायी चालत रस्ता ओलांडत होत्या. यावेळी विक्रम दामाजी राठोड (रा. नरखुरी तांडा, जळकोट, ता. तुळजापूर) याने दुचाकी निष्काळजीपणे, हयगईने चालवून सुभद्राबाई वाकळे यांना जोराची धडक दिली. अपघातात सुभद्राबाई गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मृत झाल्या. त्याचे नातू जगन वाकळे फिर्यादीवरून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आला आहे.

 
Top