उस्मानाबाद/प्रतिनिधी -
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या  २४ तासात कोरोनामुळे तिघांचा  मृत्यू  झाला आहे.  त्यात  उस्मानाबाद शहरातील दोन आणि कारी  येथील  एक  अश्या तिघांचा समावेश आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णाची संख्या सहा झाली आहे. माञ आरोग्य  विभाग माञ पाच जणांचा  मृत्यू झाल्याचे सांगत आहे.
उस्मानाबाद शहरातील देवी मंदिर परिसरातील एका २५ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे शनिवारी  मृत्यू झाला होता, त्यानंतर आज ( रविवारी ) उस्मानाबाद शहरातीलच उस्मानपुरा, काकानगर भागातील ५०  वर्षीय व्यक्तीचा  मृत्यू  झाला.  हा रुग्ण नळदुर्ग येथील कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आला होता, त्यास मधुमेह, हृदयविकाराचा त्रास होता, असे सांगण्यात आले.
त्यानंतर कारी येथील एका ७५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा  मृत्यू  झाला आहे.
या वृद्धास काही दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यास उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात ऍडमिट करण्यात आले होते. दहा दिवसानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला म्हणून डिस्चार्ज देण्यात आला होता, परंतु त्याचा देखील  मृत्यू  झालेला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत १४६ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पैकी तीन रुग्ण लातूर, सोलापूर आणि पुणे येथे ऍडमिट आहेत. त्यांची नोंद उस्मानाबाद मध्ये नाही. उर्वरित १४३ पैकी सहा बळी गेले आहेत. त्यात . गेल्या २४ तासात तीन बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. ६वा मृत्यू  नाही असे असले तरी डाॕॅ आदटराव यांनी सदर रुग्णच रिपोर्ट निगेटिव्ह आल्या नंतर रुग्णालयातुन सुट्टी दिली होती सदर रुग्णास अन्य आजार पण होते आसे सांगुन ६वा कोरोना ग्रस्ताचा मृत्यू  असे म्हणता येणार नसल्याचे सांगितलं
   कोरोना बाधित रुग्ण - १४५, बरे झालेले रुग्ण - १०४, मृत्यू  पावलेले रुग्ण - ५,  ऍक्टिव्ह रुग्ण -  ३४ याप्रमाणे  डाॅ. सतीश आदटराव यांनी सांगितले.

 
Top