उस्मानाबाद /प्रतिनिधी
उस्मानाबाद तालुक्यातील टाकळी(बें)चे व सध्या रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील, मराठी विभागाचे प्रा.राजा जगताप यांना, त्यांनी सध्याच्या कोरोना परिस्थितीत केलेल्या कार्याबद्दल  ईगल फौंडेशन, रत्नागिरी यांनी “कोरोना योध्दा”विशेष मानपञ सन्मान पुरूस्कार देवून नुकताच त्यांचा गौरव केला आहे.
लाॅकडाऊनच्या काळात २५मार्च पासून प्रा.राजा जगताप यांनी उस्मानाबाद येथील परप्रांतीय विद्यार्थी,मजूर यांचेसाठी शासकीय यंञणांनी उभारलेल्या “निवारा केंद्रात” कोरोनाला न घाबरता ,प्रत्येक्ष जावून तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या,व्यथा जाणून घेतल्या होत्या, रस्त्यांनी चालत जाणाऱ्या कांही मजूरांच्या व्यथा प्रत्येक्ष भेटी घेऊन जाणल्या होत्या.तसेच उस्मानाबाद येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहकार्यांने शहरातील गरिब व गरजू लोकांना अन्नदान, किट वाटप केले होते.
उस्मानाबाद शहरात  लाॅकडाऊनमध्ये अडकलेल्या विद्यार्थिनी यांनाही मदत केली होती.तसेच उस्मानाबाद जील्ह्यातील कांही दानशूर व्यक्ती,सामाजिक संस्था, सामाजीक कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या मदतीवर ,कोरोनाचा वाढता पादुर्भाव टाळण्यासाठी पोलीस कष्ट करत होते व त्यांच्यावर हल्ल्यांच्या घटना वाढत होत्या, स्थलांतरित मजूरांच्या व्यथा,वेदना व त्यांच्या समस्या,विविध शहरात सोशेल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा!
कोरोनात घ्यावयाची काळजी,कोरोनामुळे झालेले बळीराजांचे नुकसान,मदतीसाठी सरसावलेले बळीराजे, क्वारंटाईनमुळे उद्भवलेल्या महिला मजूरांच्या समस्या,चारही लाॅकडाऊन राज्याची,मुंबईची चिंता कसे वाढवणारे ठरले आशा विविध विषयावर २५ लेख त्यांनी सातत्याने लिहून कोरोनाबद्दल जागृती केली होती विविध विषयावरील २३ लेख हे विविध दैनिकातून प्रसिध्द झाले होते.हे लिहिण्यासाठी त्यांनी स्पाॅटवर  कोरोना योध्दा होऊन काम केल्याने, त्यांच्या कार्याची दखल रत्नागिरी येथील ईगल फौडेशनने घेतली आहे.ईगलने  राज्यातील व राज्याबाहेरील  विविध डाॅक्टर, पोलीस, पञकार व लेखण करणाऱ्यांना विशेष मानपञ सन्मान पूरस्कार देऊन गौरव केला आहे.
सध्या लाॅकडाऊन असल्याने व कोरोनाचे सावट असल्याने हा पुरस्कार सध्या ई प्रमानपञ देवून गौरव केला जात आहे असे ईगल फौंडेशनचे अध्यक्ष विलासराव कोळेकरांनी कळवले आहे.
प्रा.राजा जगताप यांना ईगल फौडेशनचा “कोरोना योध्दा पुरस्कार मिळाल्याने रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.जयसिंगराव देशमुख प्रा.डाॅ.ए.बी.इंदलकर,प्रा.बबन सुर्यवंशी, डाॅ. डी. वाय. इंगळे, प्रा. डी. एम. शिंदे ,प्रा. डाॅ.शांतीनाथ घोडके,प्रा.डाॅ.सावता फुलसागर, प्रा.नारायण सकटे यांनी अभिनंदन केले आहे.प्रा.राजा जगताप यांना हा पुरस्कार मिळाल्याने उस्मानाबाद परिसरात त्यांचे कौतुक होत आहे.
 
Top