उस्मानाबाद / प्रतिनिधी-
जिल्ह्यातील बाजारपेठ रविवारी राहणार बंद; अत्यावश्यक सेवांना वगळले उस्मानाबाद : बाजारपेठेत विविध ठिकाणी व्यापारी वेगवेगळ्या दिवशी सुट्टी घेत असल्यामुळे ग्राहक व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे आता जिल्हाभरातील व्यापारी एकाच दिवशी म्हणजेच रविवारी साप्ताहिक सुटी घेणार आहेत. व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमताने हा निर्णय घेतला असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संजय मंत्री, उपाध्यक्ष संजय मोदाणी व सचिव लक्ष्मीकांत जाधव यांनी दिली आहे.
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयात कोठेही आठवडी बाजार भरत नाही. तसेच भरणार नसल्याने जिल्हयात सर्व क्षेत्रातील वेगवेगळ्या दिवसाच्या सुट्टीमुळे ग्राहकांची,शेतकऱ्यांची गैरसोय होत असल्याने व व्यापारावरही परीणाम होत आहे. त्यामुळेच आता जिल्ह्यातील सर्व व्यापायांचे एकमत बनवून जिल्हाभर रविवार ही एकच साप्ताहिक सुट्टी असणार आहे. कोरोनाच्या संकटात 40 तासाच्या ‘ब्रेक द चेन’ मोहिमेला देखील यामुळे फायदाच होणार आहे. दरम्यान, या सुट्टीमधून पेरणीचा हंगाम लक्षात घेता खते व बी-बियाणे, अत्यावश्यक सेवा म्हणून मेडीकल व दुध विक्री केंद्र यांना वगळण्यात येत असल्याचे जिल्हा व्यापारी महासंघाने कळविले आहे.

 
Top