तुळजापूर /प्रतिनिधी
 श्रीतुळजाभवानी मंदीरातील सावळागोंधळाची जिल्हाधिकारी कार्यालयतील वरिष्ठ अधिका-यांची नियुक्ती  करुन चौकशी करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शाम पवार यांनी श्रीतुळजाभवानीमंदीरसंस्थानअध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदन देवुन केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहेकी व्यवस्थापक व धार्मिक व्यवस्थापक अंधाधुंद कारभार करीत आहेत. कोरोना पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर भाविकांना प्रवेश बंद असताना भाविकांना मंदीरात दर्शनार्थ सोडले आहे.हे मंदीराचा सीसीटीव्हीत कैद आहे संपुर्ण  सीसीटीव्ह फुटेज पाहुन अनावश्यक लोक  मंदीरात गेले आहेत .त्यची चौकशी करावी
मंदिर संस्थानचा कारभार व्यवस्थापक व धार्मिक व्यवस्थापक यांच्या नियञंणा खाली असल्याने सदर हे सीसीटीव्ह फुटेज न नोंद रजिष्टर  नष्ट करण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी अशा मंडळीना या पदावर ठेवू नये व वरिष्ठ अधिकारी कडून यांची चौकशी करावी व चोर सोडून सन्याशाला बळीचा बकरा बनवू नये असे निवेदनात म्हटलं आहे .हे निवेदन प्रत मुख्यमंत्री पालकमंञी विभागीय आयुक्त यांना पाठवण्यात आले आहे
 
Top