लोहारा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील नाग राळ (लो) येथील पोलिस पाटील तानाजी माटे यांनी कोविड १९ अर्थात कोरोना विषाणूच्या महामारित उस्मानाबाद जिल्हाधिकारी डॉ. दीपा मुधोळ- मुंडे यांनी परित केलेले आदेश जनसामान्यांपर्यंत पोहचवले. उमरगा उपविभागीय अधिकारी विठ्ठल उदमले, उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले, लोहाऱ्याचे तहसीलदार विजय अवधाणे, पोलीस निरीक्षक अशोक चौरे यांच्या मार्गदर्शनाखाली शासन, प्रशासनाने दिलेल्या आदेशाची अंमबजावणी करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.
 लॉक डाऊन, सामाजिक अंतर पाळणे, इतर राज्यातून, परजील्ह्या तून गावी आलेल्या व्यक्तींच्या नोंदी ठेवणे, त्यांना वैद्यकीय तपासणी करून घेण्यास प्रवृत्त करणे, त्यांचे अलगिकरण करणे यासह अनेक सामाजिक कामे पुढाकार घेऊन केल्यामुळे महाराष्ट्र राज्यात सक्रिय असलेल्या श्री शंकर बाबा सेवा प्रतिष्ठान ट्रस्टचे मारुती पवार, सचिन डॉ.लताजी महतो यांनी कामाची दखल घेऊन पोलिस पाटील तानाजी माटे यांना रिअल कोरोना फायटर हा पुरस्कार दिला आहे. तानाजी माटे यांचे नागराळ (लो) येथील सरपंच रितू गोरे, उपसरपंच गुंडू जाधव, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दगडू भरगांडे यांच्यासह ग्रामस्थ व मित्र परिवाराने अभिनंदन केले.

 
Top