कळंब/ प्रतिनीधी
लॉकडाऊन व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार हे सातत्याने सर्वसामान्य लोकांना बातम्या पुरवण्याचे काम स्वतःचा जीव धोक्यात घालून करत आहेत.त्यांना फ्रेशकिट द्यावेत अशी संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी व्यक्त केल्यानंतर प्रा.सतिश मातने यांनी डॉ.वेदप्रकाश पाटील सोशल फाऊंडेशनच्या वतीने कळंब तालुका पत्रकार संघाचे विश्वस्त सतीश टोणगे, कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांच्याकडे फ्रेश किट प्रदान केले.यावेळी पत्रकार  रमेश अंबिरकर,बालाजी सुरवसे,ओंकार कुलकर्णी,शिवप्रसाद बियाणी,परवेज मुल्ला,दिपक माळी हेही उपस्थित होते.
 
Top