तुळजापूर/ प्रतिनीधी
तालुक्यातील अनेक गावचा शेतकऱ्यांनी नामांकित कंपनीचे सोयाबीन चे पेरलले बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांना हा प्रकार म्हणजे दुष्काळात तेरावा महिना ठरला आहे.
कोरोना मुळे अर्थिक  संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शाषणाने कुठलीही अर्थिक मदत केली उसनेपासने करुन कर्ज काढुन काळ्या आईची ओटी भरली तर बियाणे उगवलेच नसल्यामुळे या शेतकऱ्यांन समोर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे,
या प्रकरणी  शेतकऱ्यांनी कृषी कार्यालयात धाव घेवुन कृषी अधिकारी यांना शेतात नेवुन पाहणी करण्यास भाग पाडले . कृषी अधिकारी गायकवाड यांनी पाहणी करुन ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यांनी खरेदी पावतीसह तक्रार करण्याचे आवाहन केले. तुळजापूर तालुक्यातील बिजनवाडी,  ढेकरी, सिंदफळ,  तीर्थ. बिजनवडी, बोरणद वाडी व सह अनेक गावांन मधील शेतकऱ्यांनी शहरातील दुकांनान मध्ये सोयाबीन  बियाणे खरेदी केली व ते पेरले पेरल्यानंतर अकरा ते पंधर दिवस होवुन ही ते न उगवल्याने या शेतकऱ्यांनी युवासेना शहरप्रमुख सागर इंगळे व खरेदी विक्री संघाचे व्हा चेअरमन बाळासाहेब भोसले यांच्या कडे येताच
त्यांनी कृषी कार्यालय गाठले तेथे कृषी अधिकारी तथा बिबियाणेखते तालुका तक्रार निवारण  समिती सदस्य गायकवाड यांना तक्रार सांगितली व कृषी अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या सोबत शेतात जावुन न उगवलेल्या बियाणांची पाहणी केले . सध्या सोयाबीन न उगवलेले चाळीस शेतकरी असुन यां आकड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
 शेतकऱ्यांनी रितसर तक्रार अर्ज करावा
 ज्या शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही त्यांना रितसर खरेदी पावतीसह तक्रार अर्ज करण्यास सांगितले असुन या तक्रारी  आम्ही बियाणे विक्री कंपन्यान कडे करणार असुन नंतर कंपनी चे लोक पाहणीकरण्यासाठी येतील त्यानंतर ते बियाणे बदलून देणार कि नुकसान भरपाई देणार या बाबतीत ते निर्णय घेतील त्यांनी या बाबतीत दखल न घेतल्यास कंपनी विरोधात ग्राहक मंचात शेतकऱ्यांना तक्रारी करायला लावून त्यांना न्याय देण्याकामी आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याची माहीती कृषी अधिकारी गायकवाड यांनी दिली
 
Top