उस्मानाबाद/ प्रतिनीधी
भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर हे कसबे तडवळे (तत्कालीन ता.बार्शी जि.सोलापूर)येथे दि.२२व२३फेब्रुवारी१९४१रोजी,”महार,मांग वतनदार परिषदेस”आले होते .तेंव्हा त्यांचा तेथील (तत्कालीन जिल्हा लोकल बोर्ड)आजच्या जिल्हा परिषद शाळेत ,दोन दिवस मुक्काम होता. ही बाब उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आभिमानाची  आहे.त्यामुळे कसबे तडवळे या गावाला  ऐतिहासिक वारसा लाभला आहे. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे व तेथे क्रांतीस्तंभ उभा राहावा यासाठी तेथील बोधिसत्व डाॅ.भीमराव रामजी आंबेडकर चॅरीटेबल ट्रस्ट व ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश य.सोनवणे हे  सन२०१२—२०१३पासून महाराष्ट्र शासन व उस्मानाबाद जिल्ह्यातील  संबंधित शासकीय कार्यालये यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करत मागणी करत आहेत. माञ येथील संबंधीत  शासकीय यंञणेला अद्याप जाग आलेली दिसत नाही.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंती दिनाचे औचित्य साधत २०१६मध्ये, महाराष्ट्र शासनाने कसबे तडवळ्यातील सध्याच्या जिल्हा परिषद शाळेस “राष्ट्रीय स्मारक “म्हणून केवळ घोषितच न करता सदरील स्मारक अंतर्गत बांधकामासाठी रूपये(४५,२२,८७०)व क्रांतीस्तंभासाठी(४०,८८,४४३) एकूण (पंच्याऐंशी लाख एकतीस हजार दोनशे तेवीस रूपयाचा)निधी देऊन दोन वर्षे झाली आहेत.क्रांतीस्तंभासाठी ५४चौरस मीटर जागेचे दानपञही करण्यात आले आहे. तरीही आजतागायत तेथे कसलेही बांधकाम सुरू न झाल्याने जिल्ह्यातील आंबेडकर अनुयायात संतापाची लाट निर्माण झाली आहे व त्यांच्या मनात असंतोष दिवसेंदिवस वाढत चालला आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील संबंधित शासकीय कार्यालये व त्यांचे अधिकारी यांची उदासिनता येथे आता लपून राहिलेली दिसत नाही. हा निधी परत जावा याची तर ते वाट पाहात नाहीत ना?आशी शंका आंबेडकरी अनुयायी यांना यायला लागली आहे.
सुरेश सोनवणे यांनी या स्मरकासाठी या अगोदर मा.उपायुक्त प्रादेशिक समाजकल्याण उपविभागीय, कार्यालय लातूर,महाराषट्र राज्य अनुसुचित जाती जमाती आयोग मुंबई,मा.राष्ट्रीय मानव अधिकार भवन नवी दिल्ली मा.जिल्हाधिकारी उस्मानाबाद,मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.उस्मानाबाद,मा.सहाय्यक आयुक्त समाजकल्याण उस्मानाबाद यांचेकडे वेळोवेळी निवेदने,पञके देऊन पाठपुरावा केला आहे परंतु या शासकीय कार्यालयांनी एकमेकांच्या विभागांना केवळ पञे लिहूण वेळकाढू पणा केलेला दिसतो आहे.
मा.उपायुक्त प्रादेशिक समाजकल्याण उपविभागीय, कार्यालय लातूर यांनी या स्मारक होण्यासंदर्भात मा.सहाय्यक आयुक्त समाजकल्याण उस्मानाबाद यांना तीन पञे पाठवली आहेत तर मा.सहाय्यक आयुक्त समाजकल्याण उस्मानाबाद यांनी मा.कार्यकारी अभियंता जि.प.उस्मानाबाद यांना या विषया संबंधी सात पञे लिहीली आहेत.अनुसुचित जाती,जमिती आयोग मुंबई यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना या विषयासंबधी दोन पञे पाठवली आहेत.मा.राषट्रीय मानव अधिकार भवन नवी दिल्ली यांनी, उस्मानाबाद जिल्हा पोलीस अधिक्षक यांना दोन पञे पाठवली आहेत यांनी ही त्यांना एक पञ पाठवले आहे.मा.समाजकल्याण आयुक्त पुणे यांनी प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण लातूर यांना एक पञ दिले आहे. हे ट्रस्ट व उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांचे दालनात दि.७/९/१५व दि.२९/८/२७रोजी केवळ दोन बैठका झाल्या असून आजपर्यंत सदरील स्मारकाचे काम अद्याप न झाल्याने आंबेडकरी अनुयायी यांना वेदना होत आहेत
सदर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक व क्रांतीस्तंभासाठी महाराषट्र शासनाने दोन वर्षापूर्वी दिलेला निधी  परत जाऊ नये यासाठी ताबडतोब कसबे तडवळे येथे स्मारकाच्या बांधकामाला सूरवात करण्यात यावी व हा प्रश्न ताबडतोब सोडवण्यासाठी मा.जिल्हाधिकारी यांनी लवकरात लवकर या विषयावर चर्चेसाठी वेळ द्यावा व बैठक घ्यावी आशी एका निवेदनाद्वारे मागणी काल दि.१७जून रोजी, जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी मा.खंदारे साहेब  यांना दिलेल्या निवेदनात सुरेश सोनवणे (ट्रस्टचे अध्यक्ष),प्रा.राजा जगताप,हरिभाऊ साधुराव बनसोडे(से.नि.शिक्षण विस्तार अधिकारी),आप्पा श्रीमंत कांबळे(माजी उपसरपंच ढोकी) केली आहे.
 
Top