उमरगा/ प्रतिनिधी-
 उमरगा तालुक्यातील बेटजवळगा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रा सुरेश बिराजदार यांच्या वतीने ग्रामस्थांना दि .२२ रोजी आर्सेनिक अल्बम -३० या प्रतिकारक्षमता वाढणाऱ्या गोळ्यांचे मोफत वाटप करण्यात आले .
बेटजवळगा येथे नुकताच कोरोणारूग्ण अढळुन आला होता .येथील ग्रामस्थांना कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावापासून प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने शिफारस केलेल्या आर्सेनिक अल्बम -३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले . बेटजवळगा गावातील चारशे घरांना या गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. या वितरनासाठी ग्रामपंचायत पदाधीकारी व युवक ग्रामस्थ यांनी पढाकार घेतला आहे .
 या वाटप शुभारंभ प्रसंगी प्रा.बिराजदार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे ता .अध्यक्ष संजय पवार , उमाकांत पाटील ,  सरपंच कालबाई बिराजदार   ,उपसरपंच शिवरूद्रय्या स्वामी , माजी तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश वाडीकर, माजी सरपंच संताराम बिराजदार, माजी सरपंच रामानंद मुखडे ,प्रभाकर बिराजदार, किसन पाटील, अॅड . शिवाजी बिराजदार ,प्रभाकर गायकवाड, मुस्तफा शेख यांच्यासोबत ग्रामस्थ उपस्थित होते .

 
Top