प्रतिनिधी / उस्मानाबाद
उस्मानाबाद मनसेचे युवा नेते दादा कांबळे यांनी कोरोना  व लाॅकडाऊन च्या काळात जिवाची पर्वा न करता केलेल्या कार्याची दखल घेत मुंबई येथील “सत्यवादी ह्यूमन राईट्स” संघटना मुंबई, “स्वराज्य मुस्लिम फ्रंट” मुबंई, स्वराज्य सेना “छावा संघटना” पुणे,”स्टार फाउंडेशन” संघटना,उस्मानाबाद या संस्थेने व संघटनेच्या वतीने मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे सन्मानपञ देऊन त्याचा गौरव  करण्यात आला.
 उस्मानाबाद मनसेचे युवा नेते दादा कांबळे यांनी लाॅकडाऊन च्या काळात जिवाची पर्वा न करता गरजू नागरिकांना मोफत जेवण वाटप, भाजीपाला वाटप,कर्तव्यावर असेलेल्या  पोलीसांना,डाॅक्टर,कर्मचारी यांना जेवण,पाण्याची व्यवस्था  करणे,परप्रांतीय मजुरांना किराणा सामान मोफत देणे तसेच उस्मानाबाद शहरा लगतच्या वनविभागाच्या पाणवठ्यात वन्यप्राण्यांना  टँकरद्वारे उन्हाळ्यात हजारो वन्यप्राण्यांना जंगलात पाण्याची सोय करण्यात आली आदी वििवध कामाची   दखल घेऊन मनसेचे जिल्हा सचिव दादा कांबळे यांचा सन्मानपञ देऊन  गौरव करण्यात आला.  तसेच त्यांच्यावर समाजातील विविध स्तरातून,मनसे पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळी कडून,मित्र परिवारा कडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

 
Top