उमरगा/प्रतिनिधी-
 तालुक्यातील एकुरगा परिसरात सर्वाधिक शेतकरी हळद पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेत असून सातत्याने नैसर्गिक, अनैसर्गिक संकटाचा सामना करावा लागत असल्याने हळद पिकास विमा सरंक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी तालुका कृषी अधिकाऱ्याकडे हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी(०१) शेतातच निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
तालुक्यातील एकुरगा गावात व परिसरात सर्वाधिक प्रमाणात हळद पिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक, अनैसर्गिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हळद पिकास शासनस्तरावर कोणत्याही प्रकारची मदत मिळत नसतानाही शेतकरी हळद उत्पादन घेत आहेत. शासनाने अनेक वर्षा पासून शेतकरी वर्गास नैसर्गिक संकटाचा सामना होऊ नये म्हणून पीक विमा योजनेची सुरुवात केली,मात्र हळद पिकाचे या मध्ये समायोजन केले नसल्याने तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्याना अनेक अडचणी येत आहेत. गेल्या अनेक वर्षा पासून शेतकरी वर्ग हळद पिकास विमा कवच मिळेल या प्रतीक्षेत होते.प्रशासनाकडून हालचाल होत नसल्याने या लढाईस कागदी स्वरूप आले आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी उमरगा हळद पॅटर्न राबविण्याची हमी दिली होती पण तो पॅटर्न तसाच राहिला असून तालुका कृषी अधिकारी सुनिल जाधव यांनी पुढाकार घेऊन हळद पिकास विमा कवच मिळवून द्यावे असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना बाबुराव जवळगे, सुभाष बोड गे, युवराज बोडगे,शिवानंद करके यांच्यासह एकुरगा व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
 
Top