उस्मानाबाद/ प्रतिनीधी
तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द व सलगरा दिवटी या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने गावास  खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी गावांतील नागरिकांशी चर्चा करून धिर दिला तसेच घाबरून न जाता प्रशासनामार्फत देण्यात येणाऱ्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले. व गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम- ३० या रोग प्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या होमिओपॅथी औषधांच्या गोळ्यांचे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आल्या. कोरोना बाधित रुग्ण प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या. वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी तहसिलदार श्री.सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी श्री. प्रशांतसिंह मरोड, शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, उपसरपंच आबा पाटील, प्रकाश माळी,श्री.संतोष मुळे, तलाठी, ग्रामसेवक, कोरोनाकक्ष समितीचे सर्व सदस्य, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Top