उस्मानाबाद /प्रतिनिधी-
 तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा व तामलवाडी येथे कोरोना बाधित रुग्ण आढळूनआल्याने गावास खासदार ओमराजे निंबाळकर व शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ कैलास घाडगे-पाटील यांनी भेट देऊन सद्य स्थितीचा आढावा घेतला.
यावेळी गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तींना आर्सेनिक अल्बम-३० या रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या गोळ्याचे वाटप करण्यासाठी सुपूर्द करण्यात आले. शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम-३० या गोळ्याचा वापर कसा करावा तसेच येणाऱ्या काळात कोरोना बाधित रुग्ण प्रति कोणताही भेदभाव न ठेवता त्याला परत मूळ प्रवाहात आणण्यासाठी मानसिक आधार व बळ द्या. वैद्यकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, महसूल अधिकारी यांनी सतर्क रहावे अशा सूचना दिल्या. तसेच ग्रामस्थांनी प्रशासन मार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार सौदागर तांदळे, गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.स्मिता लोंढे, तामलवाडी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. नितिन मिरकर,शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, विभागप्रमुख प्रदिप मगर, अपुराजे गवळी, ग्रा.पं. सदस्य पांडुरंग लोंढे, मुकुंद गायकवाड, मा.सरपंच वडणे, माळुंब्राचे मा सरपंच गजानन वडणे, चेतन बंडगर, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी, आशा कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.
 
Top