उस्मानाबाद / प्रतिनिधी-
शहरातील बोंबले हनुमान चौक परिसरातील आठ महिन्याच्या गर्भवतीमातेचा मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला . कोरोनाचा हा सहावा बळी ठरला आहे. सदर गर्भवतीमाता उपचारासाठी शहरातील काही खासगी दवाखान्यात गेली होती. तिला आराम मिळाला नाही. त्यामुळे ती लातूरला गेली होती. तेथील डॉक्टरांनी तिची चाचणी घेतल्यानंतर ती पॉझिटिव्ह आढळली लातूर मध्ये तिच्यावर उपचार सुरु होते. उचारादरम्यान तिचा आज मृत्यू झाला. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक राजाभाऊ गलांडे यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण 7 हजार 840 संशयीत रुग्ण आहेत. यातील 6 हजार 665 जणांना होम क्वारंटाईन तर एक हजार 139 जणांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे. 6 हजार 619 जणांनी त्यांचा क्वारंटाईन काळ पुर्ण केला आहे. आतापर्यंत 2 हजार 364 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 149 जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन हजार 33 जणांचे निगेटिव्ह अहवाल आहेत. 84 जणांचे अहवाल प्रलंबीत आहेत. तर 33 जणांचे स्वॅब नाकारण्यात आले आहेत. 71 जणाचे अहवाल इनक्न्ल्युजीव आहेत. उस्मानाबादेत 58 कोरोना विषाणु संक्रमीत रुग्णापैकी 42 जण उपचारानंतर बरे होवून घरी परतले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला आहे. तुळजापूरात 17 रुग्ण असून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णांची संख्या नऊ आहे. उमरग्यात सोळा बाधीत रुग्णापैकी पंधरा रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून एका मत्यूची नोंद आहे. लोहार्‍यात दोन्ही रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने तालुक्याच्या समावेश कोरोना मुक्त तालुक्यात झाला आहे. कळंब मध्ये 41 बाधीत रुग्णापैकी 34 जण बरे होवून घरी परतले आहेत. वाशी तालुका कोरोना मुक्त आहे. भूम मध्ये दोन बाधीत रुग्णापैकी एक जण बरा झाला आहे. तर परंडा येथील सर्व जण तेरा रुग्ण बरे होवून घरी पतरल्याने परंडा तालुका कोरोना मुक्त झाला आहे.जिल्ह्यात कोरोनाने सहा बळी घेतले आहेत.
 
Top