परंडा /प्रतिनिधी : -
गेल्या तीन माहिन्यापासून कोरोना महामारी मुळे लॉक डाऊन असल्यामुळे भल्याभल्यांचे कंबरडे मोडले असताना याच पार्श्वभुमी मुळे अनेकजण अर्थिक संकटात सापडल्याने याच कारणास्तव मंडई भीमनगर येथील महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून फायनन्स कडून घेतलेले कर्ज माफ करण्यात यावे यासाठीचे निवेदन परंडा येथील तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना अवगत करण्यातआले आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष नगरसेवक राहुल बनसोडे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे यांच्या सह महिला बचत गटांच्या अध्यक्ष- सचिव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

 
Top